वाघोलीतील सर्वच पदाधिकारी एकवटल्याचे चित्र
वाघोली : प्रतिनीधी
शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोली मध्ये महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ वाघोलीतील जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने भव्य अशी पदयात्रा काढली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोल ताशा- तुतारीच्या वाद्यात ही पदयात्रा केसनंद चौकापासून गावांमध्ये फिरत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी वाघोलीतून सर्वच पदाधिकारी एकत्र येत मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचा निर्धार वाघोलीकरांनी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव, शिवसेनेचे नेते संजय सातव, काँग्रेसचे नेते कमलाकर सातव, राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव, सुनील जाधवराव, सर्जेराव वाघमारे, शिवदास उबाळे, मारुती गाडे, चंद्रकांत कोलते, वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, ज्योती पाचरणे, कैलास सातव, दौलत पायगुडे, युवराज दळवी, मच्छिंद्र सातव, सागर गोरे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शिवरकर, शनी अन्सारी, अतुल बनकर, मंगेश सातव यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट,काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे व महाविकास आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघोली परिसरात महाविकास आघाडीचे जवळपास सर्वच पदाधिकारी एकवटल्याने वाघोली परिसरातून यावेळेस अमोल कोल्हे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजपर्यंत वाघोली मधून प्रत्येक वेळेस शिवाजीराव आढळराव पाटील यांना आघाडी होती. परंतु आत्ताचा एकूण परिस्थिती पाहता या वेळेस अमोल कोल्हे यांना आघाडी मिळेल अशी चर्चा वाघोली परिसरात सर्वत्र सुरू झाली आहे.





