- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयक पदी मस्के पाटील

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयक पदी मस्के पाटील

- Advertisement -spot_img

वाघोली : प्रतिनीधी
पुणे येथील आकाश मस्के पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य-समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. आकाश मस्के पाटील हे सदर चार वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकी मधुन जिल्हा युवक काँग्रेस वरती महासचिव म्हणून ते निवडणुन आले होते, त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभरात तसेच पुणे, मुंबई झालेल्या आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता तसेच सदरील आंदोलनासाठी त्यांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेतले आहेत.
नुकत्याच झालेल्या न्याय जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते. सक्रीय विद्यार्थी चळवळीतुन घडत गेलेला हा कार्यकर्ता स्वतः च्या मेहनती वर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयक या पदापर्यंन्त मजल मारण्यात यशस्वी ठरला आहे. विद्यार्थी व युवकांच्या अडचणींच्या काळात विविध प्रकारची आंदोलने करुन राज्य सरकारच लक्ष वेधन्यास ते यशस्वी ठरले आहेत
आताही तेवढ्याच तत्परतेने युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे तसेच युवक काँग्रेस राज्यभर वाढविण्यासाठी पुर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीबद्दल त्यांनी काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी तसेच युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही.श्रीनिवास, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या रजनीताई पाटील, राष्ट्रीय प्रभारी क्रष्णा अल्लावरु, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी उदय भानु, एहसानभाई खान, सहप्रभारी रोहित कुमार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे,प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, बीड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल सोनवणे, ऋत्विक धनवट यां यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा असून या निवडीबद्दल मस्के यांनी वरिष्ठांचे आभार मानले आहेत.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या राज्य समन्वयक पदी झालेल्या निवडी बद्दल मस्के पाटील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page