- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआपटी येथे महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण

आपटी येथे महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण

- Advertisement -spot_img

निगुडघर प्रतिनीधी : बाबाजी साळेकर
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था रुडसेट तळेगाव दाभाडे तालुका मावळ पुणे व ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने आपटी ता. भोर येथे प्रशिक्षणार्थीना १३ दिवसाचे बांबू आणि वेद हस्तकला या या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये बाबू पासून शोभिवंत व दैनंदिन वापराच्या वस्तू जसे आकाश कंदील, विविध प्रकारचे दिवे, मोबाईल स्टॅन्ड, पेन स्टँड, दागिने, फर्निचर, ट्रे इतर हे वस्तु शिकवलं जात आहे. यासाठी सरुडसेट ने बाबू चे प्रशिक्षक सागर पवार, संदिप पाटील, संस्थेचे संचालक प्रवीण बनकर हे प्रशिक्षण देत आहे. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे येथील प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू व भोर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरण कुमार धनावडे साहेब याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी आपटी ग्रामपंचायतचे सरपंच शंकर पारठे, उपसरपंच अविनाश गायकवाड, सदस्य वसंत पारठे, सदस्य प्रकाश पारठे, सदस्य मीना पारठे, सदस्य शीतल कोंढाळकर, सदस्य प्रज्ञा सालेकर व ग्रामसेवक श्रीमती पी. डी .जाधव, ग्राम.प.कर्मचारी दत्तात्रय पिलाने, रोटरी आँफ राजगड भोरे अध्यक्ष नवले सर, विनय कुलकर्णी, मा. सरपंच रघुनाथ पारठे, माजी उपसभापती लक्ष्मण पारठे, बाळासो गाडे, विजय गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या संपुर्ण प्रशिक्षणासाठी ग्रामस्थ बचत गटाचे सीआरपी नंदा पारठे व अंगणवाडी सेविका रंजना पारठे यांनी खुप मेहनत घेतली. जेवण, चहा नाश्ता, टी-शर्ट, गणवेश मोफत देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रशिक्षणातील ना कौशल्य विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एनसीवीटी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रस्तावना प्रशिक्षक संदिप पाटील यांनी केली व आभार पवार सर यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page