गजानन गव्हाणे पाटील
शिरूर लोकसभेतील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आज दि. २८ रोजी सोलापूर रोड वरील उरुळी कांचन येथे होणार असून पवार यावेळी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता कुठे प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे.

शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक तर जुन्नर विधानसभेत दोन सभा होणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघ, सभांचे नियोजन
२८ एप्रिल – उरळीकांचन, या. हवेली (शिरूर – हवेली विधानसभा)
३० एप्रिल – ओतूर बाजार, ता. जुन्नर (जुन्नर विधानसभा)
६ मे – कात्रज (हडपसर विधानसभा)
७ मे – मा. आदित्य ठाकरे यांची रॅली (भोसरी विधानसभा)
८ मे – रांजणगाव, ता. शिरूर (आंबेगाव – शिरूर विधानसभा
१० मे – चाकण बाजार समिती आवार (खेड – आळंदी विधानसभा)
११ मे – सांगता सभा राजुरी, ता. जुन्नर (जुन्नर विधानसभा)





