कोरेगाव भिमा :
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील शिंदे कुटुंबातील जयश्री बापूसाहेब शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ४३ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पाठीमागे पती, एक मुलगा, मुलगी, सासू असा परिवार आहे कोरेगाव भिमा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष तसेच श्री छत्रपती संभाजी हायस्कूल स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बापूसाहेब दत्तात्रय शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या.





