- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी सीता जाधव...

स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी सीता जाधव यांची नियुक्ती

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
केसनंद, ता. हवेली येथील सामाजिक कार्यकर्त्या सिता रामचंद्र जाधव यांची नुकतीच स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी सीता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी दिले.
स्वाभिमानी मराठा महासंघ देशातील मराठा समाज अराजकीय पध्दतीने एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. “कुणी कुठल्याही पक्षात, फक्त मराठा म्हणून एकत्र या” हे ब्रीद वाक्य घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ चळवळ उभी असुन मराठा आरक्षण, शिवस्मारक, मराठा समाजातील बेरोजगारी, शेती मालाला हमीभाव अशा विविध विषयांवर संघटना कार्यरत आहे. याच विषयावर महिला मध्ये जनजागृती व्हावी व मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या सीता जाधव यांची स्वाभिमानी मराठा महासंघ महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सीता जाधव निवडी प्रसंगी म्हणाल्या की, मराठा समाजातील स्त्रिया इतिहास काळापासून लढाऊ आहेत त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी महिलांनी पुढे यावे त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करीन तसेच शेतकरी प्रश्न हातात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघटना कार्य करेल
सीता जाधव यांच्या नियुक्तीचे स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार, प्रदेशाध्यक्ष गौरव पवार, कार्याध्यक्ष दिपक पवार, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पठारे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अभिजित खैरे, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी,पुणे जिल्हा अध्यक्ष अलका सोनवणे,पुणे शहर अध्यक्ष सविता खोजे, हवेली तालुका अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे आदिंनी स्वागत केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page