गजानन गव्हाणे पाटील
पुणे लोकसभा भाजप उमदेवार मुरलीधर मोहोळ यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारीला अर्ज दाखल केला. यावेळी मुरलीधर मोहोळ यांना सर्व स्तरातून मोठे पाठबळ मिळत असल्याचे दिसून आले.

पुणे लोकसभा मतदारसंघा शेजारील पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाघोली येथील भाजपचे हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल दिलीप सातव पाटील यांची देखील मोहोळ यांना भक्कम साथ लाभणार आहे. अनिल सातव पाटील यांनी वाघोली, खराडी, लोहगाव,चंदननगर,वडगावशेरी परिसरातून जवळपास १००० पेक्षा अधिक मित्र परिवाराला सोबत घेऊन व तब्बल ३०० पेक्षा अधिक चारचाकी व मोटार सायकल घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी वाघोली येथे मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.

अनिल सातव पाटील यांनी आपल्या मित्र परिवारासह वाघोली, खराडी, लोहगाव ,चंदननगर ,वडगावशेरी परिसरातून जवळपास १००० मित्र परिवाराला घेऊन सहभागी झाल्यामुळे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना अनिल सातव पाटील यांची भक्कम साथ लाभल्याचे व पुण्यातील सर्व जनतेचा मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे एकंदरीतच मुरली अण्णाचा विजय निश्चित दिसत आहे. असा विश्वास अनिल सातव यांनी व्यक्त केला.
यावेळी किसान मोर्चा प्रदेशाचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, वाघोली शहर प्रमुख केतन जाधव यांच्यासह हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.





