- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमशंभूराजांच्या समाधीस्थळावर लोटला शंभूभक्तांचा महासागर : हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्ठी शासकीय मानवंदना, शस्त्रास्त्रांनी दिली...

शंभूराजांच्या समाधीस्थळावर लोटला शंभूभक्तांचा महासागर : हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्ठी शासकीय मानवंदना, शस्त्रास्त्रांनी दिली मानवंदना

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक, ता. शिरूर येथे आज राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्तानी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोटगर्दी केली होती. यावेळी हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्ठी व शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्व प्राप्त झाले .
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलीदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक, ता. शिरुर येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे बारा वाजता मंत्रोपचारात हेलीकॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे , आमदार अ‍ॅड अशोक पवार , अभिनेते प्रविण तरडे , जिल्हा नियोजनचे पंडित दरेकर , जिल्हा बँकेच्या माजी संचालीका वर्षा शिवले , जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे , माजी सरपंच प्रफुल्ल शिवले , अंकुश शिवले, वढु बुद्रुकच्या सरपंच सारीका अंकुश शिवले, स्मृती समितीचे सोमनाथ भंडारे , लक्ष्मण भंडारे ,उपसरपंच हिरालाल तांबे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच लाखोंच्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते. त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार समाधी स्थळावर पोलीसांनी शासकीय मानवंदना दिल्याने बलीदानस्मरण दिनास वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी पै. संदिप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढु बुद्रुक – तुळापर , धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण गोदाकाठ येथुन पालखी , श्री शिरुर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढु बुद्रुक पालखी , पुण्यातुन हेडगेवार ज्योत , आईसाहेब अध्यात्मिक ज्ञान विज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढु पालखी व राज्य भरातुन असंख्य शंभुभक्त ज्योत घेवुन समाधीस्थळावर आगमण झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावर्षीचा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारा स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांना तर स्मृती समितीच्यावतीने देण्यात येणारा धर्मविर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना बालयोगी महाराजांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की ,‘पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेला २५० कोटींचा निधी आमदार पवारांनी आता ३०० कोटीवर नेला असुन या शक्तिस्थळाला अलौकीक महत्व असुन येथिल स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
आमदार अशोक पवार यांनी सांगितले की वढू-तुळापुरच्या विकासासाठी २५० कोटी निधी मंजुर असताना याठिकाणचा विकास जागतीक दर्जाचा करुन शंभूराजांना अभिवादन ठरणार असताना जगाला आदर्शवत असे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
यावेळी गायत्री फरताळे या मुलीने शिववंदना सादर केली तर पंचक्रोषीतील शंभूभक्तांच्यावतीने व धर्मवीर संभाजीराजे युवा मंच यांच्या माध्यमातुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे युवा मंच यांच्या माध्यमातुन छावा या ऐतिहासीक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वागत सारीका शिवले यांनी व प्रास्तविक अंकुश शिवले , सोमनाथ भंडारे यांनी तर आभार हिरालाल तांबे यांनी मानले. सुत्रसंचलन अमोल दरेकर, अशोक भंडारे यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page