पुणे : प्रतिनीधी
प्रीती महिला बचत गटाच्या माध्यमातून केसनंद ता. हवेली व परिसरातील महिलांसाठी नुकतेच साडेतीन शक्तीपीठ दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रीती महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा पोलीस संघटनेच्या कार्याध्यक्षा सीता रामचंद्र जाधव यांनी आपली लोकशाहीशी बोलताना दिली.
साडेतीन शक्तीपीठ दर्शन यात्रेच्या माध्यमातून ४० पेक्षा जास्त महिलांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या वेळी महिलांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटताना आपल्या जीवनातील एक आनंद एक क्षण असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. या सहली अंतर्गत महिलांना कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्योतिबा, तुळजापूर, परळी वैजनाथ, औढा नागनाथ, नाशिक सप्तशृंगी गड, शिर्डी आधी ठिकाणी नेण्यात आले.

प्रीती महिला बचत गट, पोलीस मित्र संघटना तसेच आनंद ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या साडेतीन शक्तीपीठे दर्शन यात्रेसाठी अमोल दारकुंडे, ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
या साडेतीन पिठाच्या सहलीसाठी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष सुरेश वाळेकर, बाबासाहेब काटे आदींनी नियोजन व व्यवस्थापन केले. तसेच या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे आभार बचत गटाच्या सचिव संगीता सातव यांनी मानले.
” घरची जबाबदारी सांभाळत असताना इच्छा असूनही एकत्रित पणे सहलीला जाता येत नव्हते. परंतु बचत गटाच्या माध्यमातून साडेतीन शक्तीपीठांची यात्रा गटाच्या प्रमुख सीता जाधव यांच्या माध्यमातून घडविण्यात आली. यामुळे आम्हाला मोठा आनंद झाला असून या पुढील काळात देखील अशा प्रकारची यात्रेचे आयोजन करावे अशी आमची इच्छा आहे. —- पूजा हरगुडे





