- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणछत्रपतींचे शौर्य, पराक्रम, नितीमूल्य आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी : संजय फडतरे

छत्रपतींचे शौर्य, पराक्रम, नितीमूल्य आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी : संजय फडतरे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम, नितीमूल्य आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष तसेच विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक २ चे माजी चेअरमन संजय आप्पा फडतरे यांनी व्यक्त केले.
कोरगाव भीमा ता. शिरूर येथील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय फडतरे बोलत होते. या वेळी मा. उपसरपंच कांतीलाल फडतरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे घुटे आदी मान्यवर विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी ढोल लेझीम च्या पारंपारिक वाड्यात विद्यालयाच्या प्रांगणात महाराजांच्या प्रतिमेची भगवे झेंडे हातात घेत जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. त्याच बरोबर शिवगर्जना, पोवाडे, नृत्य तसेच काही विद्यार्थी व शिक्षकांनी महाराजांच्या पराक्रमाचे प्रसंग सांगितले. तत्पूर्वी संजय आप्पा फडतरे, कांतीलाल फडतरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, बेबी झावरे, शिल्पा मेस्तरी, निर्मला मुरकुटे, गीता ढगे, स्वप्नाली घावटे, शीतल ताठे, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, अश्विनी उन्हाळे, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया गव्हाणे, मिलिंद गायकवाड, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, सुप्रिया कुंभार, संजय पेंटूले, आशा शिवले यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page