गजानन गव्हाणे पाटील
जय जिजाऊ – जय शिवराय च्या जयघोषात आणि शिवगर्जनेच्या निनादात कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पारंपरिक लेझिम सोबत पालखीतून शाळेच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी अनेक विद्यार्थी मावळ्यांच्या पेहरावात तर मुली पारंपरिक साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका भंडारे, कार्यक्रमाचे अध्यक्षा सृष्टी अशोक मडके, शालेय व्यवस्थापन सदस्य सागर घावटे व इतर शिक्षकांचे हस्ते करण्यात आले.

आजचे शिवजयंती चे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी पाळणा, पोवाडा, नृत्य यातून छत्रपतींचा इतिहास विद्यार्थी व पालकांचे समोर ठेवला. याला विद्यार्थी व पालकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. तर आलेल्या विद्यार्थ्यांना तेजश्री घावटे यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालक शर्वरी गव्हाणे, कस्तुरी मुसमाडे यांनी तर नियोजन जयमाला मिडगुले यांनी केले.





