- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहेरिटेज वॉकमधून उलगडला रायगड किल्ल्याचा इतिहास

हेरिटेज वॉकमधून उलगडला रायगड किल्ल्याचा इतिहास

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष महाराष्ट्रभर साजरे होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग व पर्यटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर नुकताच हेरिटेज वॉक संपन्न झाला.
रायगडावरील महादरवाजा, पालखी दरवाजा, राणी महाल, नगारखाना, बाजारपेठ, हत्ती खाना, गंगासागर तलाव, शिरकाई देवी मंदिर, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ, टकमक टोक किंवा कडेलोट टोक, हिरकणी बुरुंज, राजसभा, खलबदखाना, राजभवन इत्यादी ठिकाणचा इतिहास या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

हेरिटेज वॉकमध्ये ४५ जणांचा सहभाग नोंदविला. इतिहास विभाग प्रमुख डॉ. भूषण फडतरे, डॉ. सचिन कांबळे, प्रा. काजल रावडे, नवनाथ बटुळे, विद्यार्थी शुभम आवळे, रोहन खिलारे, आदित्य सूर्यवंशी, गौरी भंडारे, हर्षदा ठाकूर, अक्षदा कुंभार यांनी नियोजन केले.
तर भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, कला शाखा प्रमुख डॉ. सिद्धेश्वर गायकवाड, आय. क्यू. एसी समन्वयक डॉ. माधुरी देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page