- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणलोणीकंद वाहतूक पोलिसांची २५ मॉडीफाईड बुलेटवर कारवाई ; बुलेटचा सायलेन्सर जप्त करून...

लोणीकंद वाहतूक पोलिसांची २५ मॉडीफाईड बुलेटवर कारवाई ; बुलेटचा सायलेन्सर जप्त करून ठोठावला दंड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या २५ मॉडीफाईड बुलेट सायलेन्सरवर लोणीकंद वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली आहे. बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन दंडात्मक कारवाई देखील करण्यात केली गेली. जप्त केलेल्या २५ सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवला. वाघोली तसेच परिसरातील गावांमधील शाळा, महा विद्यालय परिसरात सायलेन्सरचा आवाज काढून फिरणाऱ्या बुलेटची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यावर पुणे शहरातील रेकॅार्डवरील गुन्हेगारांची हजेरी घेवुन सज्जड दम भरलेनंतर पुणेकरांच्या वाहतुक समस्येच्या दृष्टीने वाहतुक जाम होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजिले आहे. तसेच ज्या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये फेरफार करून कॉलेज परीसर व सामान्य नागरिाकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोडरोमिओ हे त्या बुलेटच्या पुंगळ्या काढुन वेगवेगळे आवाज काढुन रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवित असतात. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन पोलिसांनी केले आपल्या परिसरात अशा बुलेट फिरत असतील तर त्या बुलेटचा फोटो काढुन कठोर कारवाईसाठी ९८२२७४२३३३ या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी केले आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वाहनावरील दंड तडजोडीने भरण्याची संधी
पुणे शहर वाहतुक शाखेमार्फत ९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत लोक अदालत राबविण्यात येत असून ज्या वाहनांवर दंड आहे अशा वाहनांचा दंड तडजोड शुल्क आकारुन भरून घेण्यात येणार आहे तरी या संधीचा जास्तीत जास्त फायदा लोणीकंद विभागातील नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन लोणीकंद वाहतुक विभागाने केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page