गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील निलेश संभाजी गायकवाड यांची नुकतीच रिपब्लिकन सेना पक्ष अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते व मार्गर्शनाखाली रिपब्लिकन सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच पुणे जिल्हा सरचिटणीस पदी कृष्णा चंद्रकांत गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी भूषण एकनाथ गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बाबासाहेब अण्णा सोनवलकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी कोरेगाव भीमा समितीचे अध्यक्ष सर्जेराव (भाऊ) वाघमारे, रिपब्लिकन सेना कामगार प्रदेश अध्यक्ष युवराज बनसोडे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, राज्य उपाध्यक्ष खाजामिया पटेल, राज्य उपाध्यक्ष संजय देखने, पश्चिम महाराष्ट्र विभाग महासचिव राहुल भालेराव, सुहास वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





