- Advertisement -spot_img
Homeक्राईमडंपरच्या धडकेत वाघोली येथील सायकलस्वार सिक्युरिटी गार्डचा मृत्यू ; चालकाविरोधात गुन्हा दाखल

डंपरच्या धडकेत वाघोली येथील सायकलस्वार सिक्युरिटी गार्डचा मृत्यू ; चालकाविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
डंपरच्या धडकेत वाघोली येथील सायकलस्वार सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याची घटना ग्रांट रोड खराडी येथे किंग हेअर सलून समोर गुरुवारी (दि.१) घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ध्रुव कुमार यादव (वय ३१, रा. उबाळेनगर, वाघोली, मुळगाव, उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत जमालुद्दीन सय्यद (३०, रा. उबाळेनगर, वाघोली) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हा वाघोली येथे वास्तव्यास होता तर तो खराडी भागातील आयटी कंपनीत सिक्युरिटी गार्डचे काम करीत होता. दुपारी तो कामाला जाण्यासाठी निघाला असताना भरधाव डंपरने सायकलस्वार यादवला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यादवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page