- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमश्री क्षेत्र वढु बुद्रुकमध्ये जागतीक दर्जाचे स्मारक उभे राहणार ; विकास आराखडा...

श्री क्षेत्र वढु बुद्रुकमध्ये जागतीक दर्जाचे स्मारक उभे राहणार ; विकास आराखडा अंतिम टप्यात

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी         

श्री क्षेत्र वढु बुद्रुक, ता. शिरुर येथिल छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असुन शंभूछत्रपतींचा प्रेरणादायी इतिहासातुन समाजातील प्रत्येक स्थरातील तरुणांना आदर्श निर्माण होईल असे स्मारक उभे राहणार असुन शासनाने यासाठी तब्बल तीनशे कोटिचा विकास आराखड्यास मंजुरी दिली असुन त्यासाठी आर्टिटेक्टची स्पर्धा घेण्यात आली असुन लवकर वढू-तुळापुरला जागतीक दर्जाचे स्मारक उभे राहिल असे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

श्री क्षेत्र वढु बुद्रुक, ता. शिरुर येथिल छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३३ वा बलीदानस्मरन दिन संपन्न झाला शासकीय पुजा जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख ,पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख , शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख , तहसिलदार उंबरखांडे , गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे , जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे , सरपंच सारीक शिवले , माजी सरपंच प्रफुल्ल शिवले , अंकुश शिवले उपसरपंच हिरालाल तांबे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे , कृष्णा आरगडे , अनिल भंडारे , अंजली शिवले , ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे , पोलीस पाटिल जयसिंग भंडारे , आदी उपस्थित होते. शंभुराजांच्या समाधीची शासकीय पुजा केल्यानंतर उपस्थितांनी शंभूराजांच्या पुणार्कृती पुतळ्याची पुजा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय पुजेस आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत वढु बुद्रुक यांच्यावतीने शंभुप्रतिमा देवुन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी अशोक पवार यांनी सांगितले की, वढू बुद्रुक येथे शंभूराजांची समाधी असल्याने यापरिसराचे मोठे महत्व आहे. या परिसराचा विकास करताना जागतिक दर्जाचे स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तीनशे कोटी रुपये निधी दिला असल्याने तमाम शंभूभक्तांच्यावतीने राज्यशासनाचे आभार मानताना याठिकाणचा विकास जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याने भव्यदिव्य स्मारक उभे राहिल असे सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page