- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणअसाध्य आजारावर शिरूर च्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार

असाध्य आजारावर शिरूर च्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
प्रगत अत्याधुनिक उपचार तसेच डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल १९ दिवस व्हेंटिलेटर वर ठेवून ही रुग्णाला बरे करण्याची किमया शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल ने साधली आहे.
याबाबत श्रीगणेशा हॉस्पिटलचा वतीने ज्ञानगंगा विश्व विद्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आखिलेश राजूरकर यांनी सांगितले की, सोमा टोपोनो (वय.२३, रा. सध्या आमदाबाद फाटा, शिरुर मुळ रा. कोलकाता) या रुग्णाला गंभीर अवस्थेत (दि.१४) जानेवारी रोजी श्री गणेशा हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
यावेळी हॉस्पिटल मध्ये दाखल करत असताना रुग्णाला हातपाय हलवता येत नव्हते. शरीर ताठरलेले अवस्थेत, कमरेखाली प्रचंड वेदना, तोंड उघडत नव्हते परिणामी बोलता येत नव्हते, श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. आदी गंभीर स्वरूपात लक्षणे असताना रुग्णाला दाखल केले असताना डॉक्टरांना नेमके निदान करणे आवश्यक होते. यावेळी सर्व आवश्यक तपासण्या केल्या असता रुग्णास धनुर्वात (tetanus) मधील दुर्धर आजाराचे निदान झाले.
धनुर्वात हा आजार अतिशय दुर्मिळ असा असून भारतात मागील वर्षी ५८ रुग्णांची नोंद आढळून आली आहेत तर सन २०१९ मध्ये जगभरात ७३ हजार रुग्ण सापडले असून त्यांपैकी ४८ हजार रुग्ण दगावल्याची नोंद आहे. लहान मुले ते धनुर्वात लस न घेतलेले रुग्ण याची शिकार होत आहे. श्री गणेशा हॉस्पिटल येथे रूग्ण दाखल केल्यानंतर स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले. रुग्णाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या वॉर्ड मध्ये प्रकाश विरहित व आवाज येणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. टिटॅनसइम्युनोग्लोब्युलिन हे इंजेक्शन भारतात कमी प्रमाणात उपलब्ध असताना त्यास मागवून घेऊन त्या इंजेक्शन मधील औषधाचा काही भाग मनक्यात व मांसपेशीत देण्यात आला. सातत्याने रुग्णावर लक्ष ठेवण्यात आले. ज्या ठिकाणी जखम आहे त्याची विशेष काळजी घेण्यात आली. सुमारे १९ दिवस रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले.
सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) बंद करण्यात आले असून रुग्ण स्वतः श्वास घेत आहे. प्रगत अत्याधुनिक उपचार पद्धती व श्री गणेशा हॉस्पिटल चे डॉक्टर व स्टाफ ने घेतलेल्या मेहनतीमुळे दुर्धर आजारावर मात करत रुग्णास वाचविण्यात यश आल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. अखिलेश राजुरकर व संचालक डॉ. विशाल महाजन यांनी सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत असताना संपूर्ण करिअर मध्ये अशा प्रकारचा रुग्ण प्रथम पहावयास मिळाला असून त्यावर अचून निदान, योग्य उपचार दिल्याने दुर्मिळ आजारावर इलाज करता आला आहे. या साठी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे तज्ञ डॉ. सारंग पाठक, डॉ. सौरभ पाठक, डॉ. अक्षय काळे, डॉ. अभय घोडेकर, डॉ. सुमित रोकडे, डॉ. शुभम घोडे, जहारे फिजिओथेरपिस्ट डॉ. पूनम केंदळे, डॉ. सागर केदारे, सुरज खरात, शिल्पा झंजाड, शुभांगी गावडे, मोनिका गायकवाड, प्रेतीना मोची, आशिकेश शेळके, शीतल पोकळे, वैशाली पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले .
या विषयी अधिक माहिती देताना आमदाबाद येथील मंगेश थोरात व राहुल थोरात यांनी सांगितले की, श्री गणेशा हॉस्पीटलने सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार केलेच परंतु महागडी औषधे देखील बाहेरुन मागविली. रक्ताचे नाते नसतानाही आमदाबाद ग्रामस्थ व श्री गणेशा हॉस्पीटलने दाखविलेल्या तत्परतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेस ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचा संचालिका अमृता घावटे , डॉ . प्रा नितीन घावटे , रावसाहेब चक्रे आदी उपस्थित होते .

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page