- Advertisement -spot_img
Homeक्राईमजबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार जेरबंद

जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार जेरबंद

- Advertisement -spot_img

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी
गजानन गव्हाणे पाटील
एकवीस जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. त्याच्या कडून चार मोबाईल, एक कॅमेरा व कार हस्तगत करण्यात आले. राजन गोपाल नायर (वय 33 वर्षे, रा. मु. पो. न्यू कोपरे रोड, प्राथमिक शाळे जवळ, उत्तमनगर ता. हवेली जि.पुणे) असे ताब्यात घेतलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील भैरवनाथ तळ्याजवळ एका कार मध्ये एक जण संशयरीत्या असल्याची माहिती युनिट सहाला मिळाली. पथक तेथे पोहचले असता तो पळून जावू लागला. पथकाने त्याला पाठलाग करून पकडले.  त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे चार मोबाईल, कॅमेरा आढळून आले. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात २१ जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्याने विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

गुन्हे शाखाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीमुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page