गजानन गव्हाणे पाटील
अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता पुरस्कार वितरण सोहळा व महिला मेळावा पार पडला.
त्यावेळी कृष्णा खोरे कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे, उद्योजिका रत्नावली इंगळे यांच्या मुलाखतीने महिलांना नवीन प्रेरणा मिळाली तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्य करणाऱ्या दहा महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्ष श्रुतिका पाडळे, भाग्यश्री बोरकर, सुद्धा पाटील, मिलन पवार, कामिनी मेमाने, छाया डिंबळे, रागिनी अमराळे, सोनिया कदम, विनया वीसे, शुभांगी वाबळे, अश्विनी शिंदे, गौरी घाडगे, राणी भोसले तसेच अन्य पद्धती पदाधिकारी उपस्थित होते.





