गजानन गव्हाणे पाटील
मराठा समाजाला मिळणारे आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात असून २६ जानेवारीला मराठा समाजाने मुंबईला प्रचंड संख्येने यावे असे आवाहन मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी शिरूर तालुक्यातील कोरगाव भीमा येथे केले.
दिवसभर महामार्गावर जरांगे पाटील यांची एक झलक पाण्यासाठी रस्त्यावर उभे असणारा सकल मराठा समाज रात्री उशिरा पर्यंत रस्त्यावरच उभा होता. आंदोलनासाठी मुंबई ला निघालेल्या बांधवांना जेवण, पाणी, बिस्कीट पुडे देत होता. अंगावर काटा उभा रहावा असा दिवसभर अनुभव अनेकांना आला. अखेर रात्री १२ वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कोरेगाव भिमा मधील चौकात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोरेगाव भिमा ग्रामपंचायत, ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने हार घालून त्यांचे भव्य नागरी स्वागत करण्यात आले.
यावेळी मराठा आरक्षणाचा अशी ग्वाही देताना जरांडे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला. मराठा समाजाला आरक्षण साठी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी बांधील असून मराठा समाज जर मुंबई ला आंदोलनात एकत्रित बसला तर नक्कीच आरक्षण मिळेल असे विश्वासही जरांडे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
अंतरवाढीसाठी येथे एकत्र आलेला मराठा समाज सभेच्या जागी पेक्षा अगदी बांधवांवर उभा असल्याचेही सांगताना यापुढे आपला मराठा समाज कोणत्याही परिस्थितीत फुटू द्यायचं नाही असा शब्द यावेळी त्यांनी उपस्थित सकल मराठा समाजाच्या बांधवांकडून घेतला. आता यापुढे एकत्र आलेला मराठा फुटू देता कामा नये तसेच मी मराठा असल्याचा मला अभिमान व गर्व असल्याचे प्रतिपादनी मनोज जरांडे पाटील यांनी यावेळी केले.

मुंबई येथे २६ जानेवारीला मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी सर्व मराठ्यांनी आपली कामधंदे सोडून मुंबईला आल्यास मराठा आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता आपलं नसून आपल्या मुलांचा आहे मराठा आरक्षण मिळे पर्यंत मी मागे हटणार नाही असे आश्वासन यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना दिले. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सोडणार नसल्याची तंबी देत विरोधकांसाठी मी पुरेसा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
मराठा समाजाच्या खांद्यावर एक जबाबदारी असून तुमच्या पाठिंबाची गरज असल्याचे त्यांनी सांगत मराठा आरक्षण हे आता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी ओबीसी मधूनच घ्यायची असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कोरेगाव भिमा येथील स्वागत स्वीकारून मनोज जरांगे पाटील वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी गेले.





