- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाज महामार्गावर

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सकल मराठा समाज महामार्गावर

- Advertisement -spot_img

शिरूर हवेलीत जोरदार नियोजन
गजानन गव्हाणे पाटील
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करणारा देवदूत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील भगव्या वादळाच्या महापुरासह शिरूर हवेली मध्ये दाखल झाले असून पुणे कडे येताना महामार्गावर सर्व गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. तसेच खाण्या पिण्याची, पार्किंगची सर्व ठिकाणी अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे.

पुण्याच्या दिशेने भगव्या वादळाचा महापूर लोटला असून पोलीस खात्याच्या वतीने वाहतुकीचे अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबई कडे निघालेल्या लाखो आंदोलकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी तसेच कुठल्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये, यासाठी महामार्गावरील वाहतूक वेगवेगळ्या पद्धतीने वळवण्यात आली आहे. शिरूर शहर, कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, वाघोली व इतर गावांमधील ग्रामस्थांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून पुणे मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या भगव्या आंदोलकांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

कोरगाव भिमा, पेरणे, वढू खुर्द लोणीकंद, कटकेवाडी विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पाणी बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे, चहा, तसेच गाव गावच्या प्रत्येक घरामधून 10 भाकरी, भाजीचे पॅकेट उपलब्ध करून दिले असून पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय महामार्गवर वाहतुकीमध्ये योग्य बदल करून पोलीस खात्याच्या वतीने वाहतुकीचे योग्य नियोजन केले आहे, सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page