- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजरांगे पाटलांच्या मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त

जरांगे पाटलांच्या मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा असणार कडक बंदोबस्त

- Advertisement -spot_img

वाहतूक पोलिसांसह शहर पोलिसांचा बंदोबस्त.
गजानन गव्हाणे पाटील
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबई दौऱ्यावर निघाले असून, पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात राहणार आहेत.


आज २३ जानेवारी रोजी रांजणगाव येथील मुक्कामानंतर जरांगे पाटील व मराठा समाजातील बांधव नगर रोडवरून कोरेगाव भीमा येथून पुणे शहर पोलिसांच्या वाघोली येथील हद्दीमध्ये दाखल होणार आहेत. सकल मराठा बांधव खराडी-वाघोली मध्यस्थांनी असणाऱ्या चोखी ढाणी रोडवरील सातव पाटील परिवाराच्या शंभर ते सव्वाशे एकर च्या मैदानात मुक्कामी असणार आहे. तेथे जेवणाची व्यवस्था, लाईटची व्यवस्था प्रसाधन गृह, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक यांच्या वतीने सांगण्यात आली आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक,१२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच एक हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. रोड बंदोबस्त करून २४ जानेवारी रोजी मोर्चा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. अशी माहिती फोर झोन चे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी दिली.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page