शिरूर : प्रतिनीधी
पुणे जिल्ह्यात सामाजिक व पञकारीता क्षेञात प्रामाणिकपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पञकार रिजवान बागवान यांची द युवा ग्रामीण पञकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
द युवा ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारभाई शेख यांनी त्यांच्या प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन त्यांना पुणे जिल्हाअध्यक्षपदाचे नियुक्ती पञ देऊन महत्वपुर्ण जबाबदारी दिली आहे.
पञकार रिजवान बागवान हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.त्यांनी विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातुन वंचित गोरगरिबांची सेवा केली आहे. आपल्या पञकारितेच्या लेखणीच्या माध्यमातुन त्यांनी जनतेचे विविध प्रश्न,समस्या,अडी अडचणी सोडविण्यासाठी विविध वृत्तपञातुन आवाज उठविला आहे. पञकारांवर होणा-या अन्यायाच्या विरोधात द युवा ग्रामीण पञकार संघाच्या माध्यामातुन आपण पुणे जिल्ह्यात पञकारांची एकजुठ करून त्यांना संघटित करून मोठा लढा उभारणार असल्याचे यावेळी पञकार रिजवान बागवान यांनी सांगितले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वंचित पञकारांना द युवा ग्रामीण संघामध्ये सामील करून त्यांना सोबत घेवुन पञकारांच्या न्याय हक्कासाठी पञकार रिजवान बागवान हे काम करणार आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल द युवा ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सारभाई शेख,महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष श्याम कांबळे,महाराष्ट्र राज्याचे सचिव रमेश राठोड, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित वाळके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुकाराम कामठे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख वजीर शेख, महाराष्ट्र राज्य खजिनदार रफिक शेख, पञकारांचे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे, शकील मणियार, विवेकानंद फंड, विश्वनाथ घोडके, चेतन पडवळ, मच्छिंद्र काळे, विजय कांबळे, सुजित मैड, संजय मोरे, सुदर्शन दरेकर, संतोष काळे, सुनिल काटे, एडवोकेट इन्नुस मणियार, गणेश जव्हेरी, आरमान मणियार आदिंनी कौतुक करून अभिनंदन केले असुन त्यांना पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.





