- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपठारे विद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर वाडे बोल्हाई येथे सुरू

पठारे विद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर वाडे बोल्हाई येथे सुरू

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कै. तुकाराम धोंडीबा पठारे वरिष्ठ महाविद्यालय चंदननगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर १८ ते २४ जानेवारी दरम्यान वाडे बोल्हाई येथे आयोजित करण्यात आले आहे. या श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन विकास प्रतिष्ठानचे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पठारे आणि वाडे बोल्हाई गावच्या सरपंच वैशाली केसवड यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. जगदाळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पठारे होते.


जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष कुशाभाऊ गावडे आणि सरपंच यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाधिकारी प्रा. सारिका साळवे यांनी सात दिवसाच्या उपक्रमाचे नियोजन जसे की ग्राम स्वच्छता अभियान, जलसंवर्धन, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, पर्यावरण जनजागृती विषयक उपक्रम याबद्दल माहिती दिली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

कार्यक्रमासाठी जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश धुमाळ, शाळा समिती अध्यक्ष विद्याधर गावडे, उपसरपंच संदीप गावडे, ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले, विद्यार्थी प्रतिनिधी सरस्वती गिरी, आकाश नाबगे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी सारिका साळवे यांनी केले तर आभार सायली कुलकर्णी यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page