गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोरेगाव-भीमा येतील बच्चू गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तसेच शिरुर हवेली चे आमदार अशोक बापू पवार यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित आप्पा दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष विश्वास काका ढमढेरे, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे,
कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे यांच्यासह महेंद्र भांडोलकर, गणेश गव्हाणे, प्रसाद ढगे, ऋषिकेश गव्हाणे आदी उपस्थित होते.





