- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगांव भिमा येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान शिबीर

कोरेगांव भिमा येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान शिबीर

- Advertisement -spot_img

पी डी सी सी बँक कोरेगाव भीमा शाखेचा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ
गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायत सभागृहात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोरेगाव भिमा, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व विविध विकास कार्यकारी सहकारी संस्था नंबर २ कोरेगांव भिमा यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक, डिजिटल साक्षरता अभियान व हळदी कुंकू समारंभ कोरेगाव भिमा ग्रामस्थ व महिला सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी चेअरमन नागेश जगन्नाथ गव्हाणे, माजी चेअरमन रमेश दादाभाऊ गव्हाणे, शाखाप्रमुख पी.डी.सी.सी. बँक अवधुत गव्हाणे, विकास अधिकारी शहनाज तांबोळी, पोलीस पाटील मालन गव्हाणे, सचिव सुभाष सातकर यांसह सोसायटी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटी चे सचिव मधुकर कंद यांनी केले तर आभार शाखाप्रमुख अवधुत गव्हाणे यांनी मानले.


सदर शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून पुणे जिल्हा मध्य. सह. बँक मर्या. पुणे तालुका समन्वयक संगीता शेवाळे, विजया मुंडे उपस्थित होत्या. केंद्र सरकारच्या २० रुपयांमध्ये जीवन ज्योती विमा योजना १८ ते ५५ वयोगटासाठी, जीवन सुरक्षा विमा योजना १८ ते ७० वयोगटासाठी, सोने तारण कर्ज योजना, तात्काळ कर्ज योजना,शैक्षणिक कर्ज योजना, इत्यादि योजनांची माहिती यावेळी शेवाळे यांनी उपस्थितीत सभासदांना देत महीलांना हळदी कुंकू लावुन तिळगुळ वाटून सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सध्या मोठया प्रमाणावर मोबाईल वरून फोन करून जी आर्थिक फसवणूक होते त्याला आळा बसला पाहिजे. सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांचा शेतकरी सभासद बांधवांनी लाभ घ्यावा.
अवधूत संभाजी गव्हाणे
(शाखा अधिकारी पिडीसीसी बँक कोरेगाव भिमा)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page