- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदी रामदास दरेकर

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पदी रामदास दरेकर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिरूर हवेली चे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडी येथील युवा उद्योजक रामदास दरेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रामदास दरेकर यांच्यावर आमदार अशोक पवारांनी टाकलेल्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीचे सणसवाडीवर विशेष प्रेम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
वक्तृत्व आणि कर्तृत्वाच्या जोरावर रामदास दरेकर यांनी सणसवाडी सह परिसरातील गावांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हेच ओळखून आमदार अशोक पवार यांनी रामदास दरेकर यांना पक्षाची विशेष जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांचा असंख्य मित्रपरिवाराच्या वतीने व आजूबाजूच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारणीमघ्ये जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास दरेकर यांची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी दरेकर यांना निवडीचे पत्र देताना खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी जिल्हा व तालुका पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.


आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, पुणे जिल्हा केसरी बालाजी गव्हाणे यांसह राष्ट्रवादी चे पदाधिकारी वा सणसवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page