- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाघोलीच्या बीजेएस विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांना भूमी फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार...

वाघोलीच्या बीजेएस विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांना भूमी फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांना भूमी फाउंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला.
आदर्श समाजसेविका कै. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्य प्रेरणेतून उभ्या असलेल्या अनाथ, निराधार, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना आणि वीर सेना पत्नींना मदतीच्या उद्देशातून प्रेरित असलेल्या भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन नुकताच पार पडला. या वेळेस राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

त्यामध्ये भारतीय जैन संघटना विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सपत्निक गौरविण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्सचे संचालक फतेचंद रांका, भारतीय हवाई दलाचे एअरमार्शल पद्माकर बापट व भूमी फाउंडेशनचे संस्थापक कैलास पवार तसेच भारतीय जैन संघटनेचे सर्व सहकारी वृंद यांचे उपस्थितीत सपत्निक स्वीकारला.
या पुरस्काराबद्दल भारतीय जैन संघटनेचे प्रबंध समिती अध्यक्ष विलास राठोड, शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, उपप्राचार्य पोपटराव गेठे व सर्व सहकाऱ्यांनी प्राचार्य संतोष भंडारी यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले. यावेळेस राज्यभरातून भूमी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व पुरस्कारार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page