निगुडघर प्रतिनीधी : बाबाजी साळेकर
आयोध्या येथून आलेल्या कोदंडधारी प्रभु श्रीरामांच्या मुर्तीचे साळव, ता. भोर येथे मोठ्या आंनदात स्वागत करण्यात आले. श्री राम नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले. मिरवणूक काढुन मूर्तीचे पुजन तसेच आरती करण्यात आली.
अनुगामी लोकराज्य महाभियान संस्थेचे भाग जनसेवक अँड. मंगेश अंबुले यांच्या हस्ते प्रभु श्रीरामांची मुर्ती आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पाठवलेले शुभेच्छा पत्र साळव येथील अनुलोमचे कार्यकर्ते बाबाजी साळेकर यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर राम भक्त भाविकांनी दर्शन तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला.

या वेळी साळव गावच्या सरपंच रेखा सागर साळेकर, उपसरपंच रामचन्द्र साळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संपत साळेकर, माजी संरपंच अंकुश साळेकर, शंकर साळेकर,भिकाजी साळेकर, सुनिल जंगम, राजेंन्द्र कोढांळकर, जगननाथ साळुंके, सचिन जंगम, सुमन साळेकर, कविता साळेकर, मनिषा जगम, मंदा कुमार, सशिला साळेकर, सुवर्णा सोनावणे, प्राजक्ता सणस, ज्योती साळेकर, अनुज सणस, दिपक साळेकर यांच्यासह श्री राम भक्त, महिला वर्ग, शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.





