गजानन गव्हाणे पाटील
पेरणे ता. हवेली जि. पुणे येथे १ जानेवारी २०२४ रोजीच्या विजयस्तंभास शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने पुणे नगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील लोणीकंद पो.स्टे. हददीत पुणे अहमदनगर महामार्गलगत भीमा नदीच्या तीरावर दि.०१ जानेवारी २०२४ रोजी विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहत असतो. दि.१ जानेवारी, २०२४ रोजी विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमामुळे पुणे- अहमदनगर या महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे .
पुणे अहमदनगर महामार्ग क्र. ६० वरील वाहतूक दि. ३०/१२/२०२३ राजी सायं, ५:०० पासून ते दि.०१/०१/२०२४ रोजी रात्री. १२:०० वा. पर्यंत बंद करुन खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे .

पर्यायी मार्ग
१. शिक्रापूर ते चाकण व चाकण ते शिक्रापूर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
२. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जङ-अवजड व इतर वाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावरा- पारगांव- केडगांव चौफुला-यवत- सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील.
३. पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर- सोलापूर हायवे रोडने केडगांव चौफुला-पारगांव-न्हावरा शिरुर मार्ग अहमदनगर रोड अशी जातील.
४. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड- अवजड व मालवाहतूक (ट्रक टेम्पो इ.) ही वाहने वडगांव मावळ- तळेगांव-चाकण- खेड- नारायणगांव- आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील,
५. मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही वडगांव मावळ-तळेगांव- चाकण-खेड- पावळ- शिरुर मार्ग अहमदनगर अशी जातील.





