- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदत्त जयंती निमित्ताने श्री क्षेत्र तुळापूर (शिवले वस्ती) येथे विविध कार्यक्रम

दत्त जयंती निमित्ताने श्री क्षेत्र तुळापूर (शिवले वस्ती) येथे विविध कार्यक्रम

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात श्रीक्षेत्र तुळापूर ता. हवेली येथील शिवले वस्तीवर श्री दत्त महाराज जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री दत्तात्रय महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.


दत्त जयंतीच्या निमित्ताने सकाळी सात वाजता दत्त महाराजांच्या अभिषेक व महापूजा, सकाळी आठ ते सायंकाळी चार दर्शन सोहळा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वरांजली महिला भजनी मंडळ श्रीक्षेत्र तुळापूर तसेच संगमेश्वर भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा तसेच रात्री दहा वाजेपर्यंत दत्त भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा परिसरातील शेकडो दत्त महाराज भक्तांनी लाभ घेतला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय (आबा) शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीदत्त ग्रुप, जय गणेश ग्रुप, जय हनुमान तरुण मंडळ शिवले वस्ती तसेच समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र तुळापूर यांच्या माध्यमातून करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page