गजानन गव्हाणे पाटील
श्रीक्षेत्र तुळापूर ता. हवेली येथील शिवले वस्तीवर श्री दत्त महाराज जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय (आबा) शिवले यांनी आपली “लोकशाही डॉट कॉम” शी बोलताना दिली.

मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता दत्त महाराजांच्या अभिषेक व महापूजा आयोजित करण्यात आले आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार दर्शन सोहळा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव सोहळा तसेच रात्री दहा वाजेपर्यंत दत्त भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन श्रीदत्त ग्रुप, जय गणेश ग्रुप, जय हनुमान तरुण मंडळ शिवले वस्ती तसेच समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र तुळापूर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे
तरी दत्त जयंती महोत्सवाच्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे





