गजानन गव्हाणे पाटील
भीम आर्मी शिरूर तालुका अध्यक्षपदी नुकतीच कोरेगाव भीमा येथील युवराज उर्फ राकेश तानाजी मसलखांब यांची तर पुणे शहर प्रभाग क्रमांक १ च्या अध्यक्ष पदी प्रिया येलदरे नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या हस्ते मसलखांब यांना देण्यात आले.
भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांचा भारतभर असणारा सामाजिक चेहरा व भीम आर्मी प्रदेश अध्यक्ष सिताराम गंगावणे यांचा महाराष्ट्रातील तरुणांमध्ये असलेला प्रतिसाद व युवकांचा वाढता कल लक्षात घेता महाराष्ट्रात आज अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पुणे जिल्हा अध्यक्ष संदिप शेलार, पुणे जिल्हा प्रभारी नागेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर प्रभाग क्रमांक १ प्रिया येलदरे व युवराज मसलखांब शिरूर तालुका अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष महादु खळगे, शिरुर तालुका विधानसभा अध्यक्ष अजित नरवडे यांचे सह नरेश गडदे, शिवाजी शिंदे, किशोर शिंदे, अविनाश गव्हाणे, सनी कांबळे, रियाज पठाण, गणेश रहाटे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भीम आर्मीचे नवनियुक्त पदाधिकारी आपल्या पदाला असे सामाजिक काम करतील यात शंका नाही. मागील काही वर्षात भीम आर्मी च्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला आहे. या पुढील काळात समाजातील विविध घटकांसाठी भीम आर्मी सदैव काम करत राहील असे प्रतिपादन यावेळी भीमआर्मी प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी केले.





