गजानन गव्हाणे पाटील
समाजाप्रती काम करण्यासाठी शौर्यपीठ श्रीक्षेत्र तुळापूर सारखे ठिकाण नसून आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या हेतूने काम करणे गरजेचे आहे. पदापेक्षा काम महत्त्वाचे असून भविष्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील असे प्रतिपादन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या संस्थापक अध्यक्ष तसेच सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र तुळापूर ता. हवेली येथे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मी पाहिलेली दुर्गा तसेच गड किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी अश्विनी महांगडे बोलत होत्या. यावेळी प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष निलेश जगदाळे, मोडी लिपी तज्ञ राम वाघोले, माजी उपसरपंच संतोष शिवले, गोरक्ष वाळके, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिवले, धर्मराज ग्रुपच्या मिताली गरड, शहाजी इंगळे, विकास जगताप, उद्योजक कुमार शिवले आदी मान्यवर, प्रतिष्ठान चे पदाधिकारी तसेच शंभुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रागिणी ग्रुप मरकळ यांच्या माध्यमातून ग्रुप चे प्रशिक्षक अशोक पवार यांच्या मार्गर्शनाखाली मर्दानी खेळ (रणरागिणी) आयोजन करण्यात आले आहे. तर शिवम चव्हाण, स्वरा वाल्हेकर, काजल काळे, आर्यन पाटील, आराध्य लांडे, काव्या लांडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे बद्दल विविध प्रसंग आपल्या मनोगतात व्यक्त केली.
सन २०२३ सालचे नवदुर्गा पुरस्कार पुढील प्रमाणे :-
अक्षता नवले इतिहास अभ्यासक मोडी लिपी
ह. भ. प. सायली महाराज बांदल (भोर)
कविता पाटणकर (प्रतिष्ठान च्या ज्येष्ठ सभासद)
कल्याणी रणसिंग (प्रवक्ता सातारा) समाजसेविका
कविता नवले (मुंबई अग्निशमन दलात फायरमन) जुन्नर
प्रिया कड (उद्योजिका) मुंबई
यमुना शिवतारे (धनगर वाडी महिला सरपंच सातारा)
स्नेहल चौधरी (वाशिम)
सविता कांचन (उरुळी कांचन, महिला बचत गट)

सन २०२३ सालचे गड किल्ले पुरस्कार पुढील प्रमाणे :-
लहान गट
प्रथम पियुष जाधव कोल्हापूर किल्ले जंजिरा
द्वितीय आर्यन पाटील ठाणे किल्ले रोहिडा
तृतीय अत्रेय खामकर वाई किल्ले विशालगड
मोठा गट
प्रथम अक्षय भोसले डोंबिवली किल्ले सिंधुदुर्ग
द्वितीय वैभव साठे नागपूर किल्ले लोहगड
तृतीय संतोषी सुतार सांगली किल्ले रामशेज
ग्रुप
प्रथम स्वराज्य दौलत दुर्गनाद प्रतिष्ठान सांगली किल्ले वासोटा
द्वितीय आजाद स्पोर्ट क्लब भांडुप मुंबई किल्ले रायगड
तृतीय अरुण निवास मित्र मंडळ डोंबिवली किल्ले देवगिरी
नवदुर्गा व किल्ले स्पर्धा विजेत्यांना सन्मान चिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
सुत्रसंचलन शीतल लाडके व प्रमोद कालकर यांनी केले तर आभार कल्याण देशमुख यांनी मानले.





