गजानन गव्हाणे पाटील
स्व.पी.सी.नाहर यांच्या स्मरणार्थ बी.जे.एस महाविद्यालयात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. नानासाहेब झगडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, स्वागताध्यक्ष तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.
स्पर्धेच्या सांघिक विजेत्या संघात अनिकेत प्रल्हाद डमाळे व महेश जनार्धन उशीर यांचा समावेश होता. विद्यावर्धिनी सभा धुळे महाविद्यालयाचा धर्मेश साहेबराव हिरे याने प्रथम क्रमांक मिळवला. लॉ कॉलेज अकोला मधील वैष्णवी संतोष हगोणे हिने द्वितीय क्रमांक तर कृषी महाविद्यालय पुणे येथील सुदर्शन समाधान लाटे याने तृतीय क्रमांक मिळवला. एस. पी. कॉलेज पुणे येथील रमेश एस. कचरे आणि मॉडर्न कॉलेज गणेश खिंड पुणे येथील कु. नितीन जगन्नाथ गागरे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले. स्पर्धेचे संयोजन सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. डॉ. सिद्धेश्वर गायकवाड, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. भूषण फडतरे, डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. सचिन कांबळे, प्रा. संजय मानवतकर, प्रा.समीर मोरे, शशिकांत केसकर, श्याम पाटील व सांस्कृतिक समितीमधील सर्व सदस्यांचे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले.





