गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी (ता. शिरुर) येथील विशाल विजय यादव याने नुकतेच प्रोफेशनल वेटलिफ्टिंग प्रो- चॅम्पियन्सरो ऑर्गनायझेशन आयोजित पुणे जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत १३ ते १९ वयोगटातून ६० किलो वजनी गटातून सहभाग घेतला होता. स्पर्धे त विशाल याने १६० किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. त्याची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धे साठी निवड झाली आहे.

स्पर्धेसाठी विशालला कोच म्हणून गौतम राज, अनिल कच्छप तसेच वडील विजय यादव, मामा दीपक पाटील व भाऊ शुभम यादव यांचे मार्गदर्शन मिळाले. विशाल यादवच्या यशाबद्दल त्याचे शिरुर तालुक्यातून कौतुक होत आहे. पुढील काळात कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाने देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असून त्या पद्धतीने वाटचाल करणार असल्याचे विशाल यादव याने सांगितले.





