- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी योगेश खोपडे तर सरचिटणीस पदी दिपक...

भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी योगेश खोपडे तर सरचिटणीस पदी दिपक खोपडे

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्यातील योगीराज मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
या कार्यकर्ता मेळाव्यात भोर तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. या मध्ये नाझरे गावचे सुपुत्र तसेच श्री दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते व एम.सी.ए. पर्यंत शिक्षण घेणारे तसेच reputed आय टी कंपनीत कार्यरत असणारे परंतु समाजकार्य करण्याची आवड असणारे उच्चशिक्षित योगेश नंदकुमार खोपडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा विषयी असणारी तळमळ पाहून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच नाझरे गावातील दिपक एकनाथ खोपडे यांची देखील सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

नाझरे गावचे सुपुत्र योगेश नंदकुमार खोपडे हे उच्चशिक्षित असले तरी त्यांना समाज कार्या बद्दल तळमळ असून राष्ट्रवादी कडून मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून पक्षासाठी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करेल असे योगेश नंदकुमार खोपडे यांनी सांगितले. यावेळी नाझरे गावातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तसेच तरुण वर्ग उपस्थित होते. योगेश नंदकुमार खोपडे यांना भोर तालुका उपाध्यक्ष पद मिळाल्या बद्दल तालुक्यातून तसेच पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे.
या राष्ट्रवादी मेळाव्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, महिलाध्यक्षा मोनिका हरगुडे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, मानसिंग धुमाळ, विठ्ठल शिंदे, यशवंत डाळ, मनोज खोपडे, प्रकाश तनपुरे, गोरख चौधरी, केतन चव्हाण, सचिन पाटणे, अविनाश गायकवाड, देवा म्हसूरकर, गणेश निगडे, महेंद्र भोरडे, नवनाथ शेटे, अतुल शिवतरे सह आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page