गजानन गव्हाणे पाटील
दक्षिण आफ्रिकेतील (Ind-SaT-20) डरबन येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना टॉस न करताच पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने क्रिकटप्रेमीं नाराज झाल्याचे चित्र आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याची सुरुवात अतिशय निराशजनक झाली आहे. पहिल्या टी-20 सामना सुरु होण्या आधीच पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये (Ind-SaT-20) भारत 3 टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट आल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे. सेंट जॉर्जेस पार्क येथे भारताचा पुढील टी-20 सामना दक्षिण आफ्रीके सोबत 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात पाऊसाची हजेरी लागेल का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





