- Advertisement -spot_img
Homeशालेयबी.जे.एस महाविद्यालयात १६ वी स्व.पी.सी.नाहर स्मरणार्थ मुक्तचिंतन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

बी.जे.एस महाविद्यालयात १६ वी स्व.पी.सी.नाहर स्मरणार्थ मुक्तचिंतन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्व. पी. सी. नाहर यांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी मुक्तचिंतन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे हे १६ वे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी ७ मिनिटांचा वेळ देण्यात आला असून प्रथम क्रमांकास ७००१ रुपये, द्वित्तीय क्रमांकास ५००१ रुपये, तृतीय क्रमांकास ३००१ रुपये आणि उत्तेजनार्थ अनुक्रमे १५०१ रुपये अशी पारितोषिके असतील. विजेत्या संघास करंडक व स्मृतिचिन्ह देण्यात येईल अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर गायकवाड यांनी दिली.
या स्पर्धेसाठी असलेले विषय : १. कृत्रिम बुद्धिमत्ता नव्या सृजनांची नांदी २. वर्तमान राजकारण : गोंधळलेले की गजबजलेले ३. नवे शैक्षणिक धोरण : वास्तवदर्शी बदल की नुसते फेसियल ४. ज्योतीबाने ज्योत पेटवली शिक्षणासाठी सावित्री घडवली ५. बेरोजगारी : गडबड, गोंधळ, गहजब. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता आव्हान करण्यात येत आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या संदर्भात अधिक माहितीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर गायकवाड(९४२३०१७२९५) तसेच सदस्य डॉ. सचिन कांबळे (९६२३६७९४५०) व डॉ. विकास बहुले यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन महाविद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page