गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती महिला आघाडी च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष (शिरूर, हवेली, खेड) पदी आपटी, ता. शिरूर येथील दिपिका भालेराव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले.

ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड, समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिशांत भालेराव, भूषण गायकवाड, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष रुचिका वासनिक, साधना काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.





