प्रतिनिधी : वैभव पवार
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका निहाय नूतन कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, अध्यक्षपदी एकनाथ थोरात यांची निवड शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह येथे जाहीर करण्यात आली.
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे यांनी स्वतः सर्व निवडी जाहीर केल्या त्या पुढील प्रमाणे :- एकनाथ थोरात (अध्यक्ष), बाळासाहेब जाधव (उपाध्यक्ष), आकाश वडघुले (सचिव), भरत घावटे (कार्याध्यक्ष), शुभम वाकचौरे (संपर्क प्रमुख), संदीप ढाकुलकर (संघटक), अल्लाउद्दीन अलवी (सहसंघटक), वैभव पवार (कोषाध्यक्ष), जयवंत पडवळ (सहकोषाध्यक्ष), सुनील जिते (समन्वयक), विनायक साबळे (संचालक), जिजाबाई थिटे (प्रमुख कार्यकारी समिती), दत्तात्रय कर्डिले (संचालक), सुनिल काटे (संचालक), शरद रासकर (संचालक), विजय ढमढेरे (संचालक) अशा निवडी जाहिरात करण्यात आले असून, राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शिरूर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिरूर तालुका पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे, सरदवाडीचे उपसरपंच गणेश सरोदे, माजी उपसरपंच कांतीलाल घावटे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात, हवेली तालुकाध्यक्ष पोपटराव मांजरे व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी तर संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.





