- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी प्रवीण अशोक फडतरे यांची निवड

पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी प्रवीण अशोक फडतरे यांची निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी कोरेगाव येथील प्रवीण अशोक फडतरे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र कॅबिनेट मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वाघोली येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रवीण फडतरे यांना देण्यात आले.


यावेळी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, संदीप भोंडवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे यांचे सह आपटी चे ग्रामपंचायत सदस्य सुरेश तिखे, वढू बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य वैभव भंडारे, अमर फडतरे, राकेश शिवले, दिनेश भोकरे, सुनील फडतरे, केदार फडतरे, गणेश गव्हाणे, ओंकार गुंडाळ, आदी उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपा चे कार्य, उपक्रम तळागाळातील युवा वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रत्येक गावातील युवा वर्ग संगठित करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण अशोक फडतरे यांनी “आपली लोकशाही ” शी बोलताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page