शिरुर : प्रतिनीधी
पुणे नगर महामार्गावरील न्हावरा फाटा, ता .शिरुर येथे झालेल्या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला मरण पावली. संध्या अभिजीत सावंत (संध्या अजय वानखेडे) वय ३३ रा. एशियन चौक, कारेगाव, ता. शिरुर असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
या बाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजीत बाळासो सावंत, रा-एशियन चौक कारेगाव ता. शिरूर यांनी अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालक विरोधात फिर्याद दिली आहे.

अभिजीत सावंत हे खाजगी कंपनीत काम करतात तर त्यांची पत्नी संध्या अभिजित सावंत या शिरूर येथे काम करतात. शिरुर येथुन कामावरुन रिक्षा नं एम. एच. १२ जे. एस. १००२ मधुन कारेगाव येथे संध्या जात असताना अज्ञात वाहनाने रिक्षास धडक दिली. त्यात संध्या अभिजित सांवत यांचा मृत्यु झाला.
या संदर्भातील अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगत करीत आहेत.





