- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा येथे भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करत खर्गे...

कोरेगाव भीमा येथे भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करत खर्गे यांचा निषेध

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी भाजपा चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खर्गे यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली.
कर्नाटकचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या वादग्रस्त वक्तव्यविरोधात भाजप रस्तावर उतरलं आहे. पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करत खर्गे यांचा निषेध करण्यात आला.


यावेळी खर्गे विरोधात जोरदार घोषणाबाजी करत खर्गे च्या फोटो ला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र भाजपा या वादग्रस्त वक्तव्या विरोधात रस्त्यावर उतरून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश कुटे, पुणे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा संदीप सातव, हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता हरगुडे, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण फडतरे, गणेश गव्हाणे, माजी जिल्हा सरचिटणीस नितीन गव्हाणे, सरचिटणीस युवा मोर्चा पुणे जिल्हा गौरव झुरुंगे, सोशल मीडिया महाराष्ट्र सदस्य समीर झुरुंगे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कुटे, बापू भुजबळ, युवा मोर्चा प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, युवा मोर्चा सरचिटणीस शिरूर तालुका रविंद्र गव्हाणे, अशोक हरगुडे तालुकाध्यक्ष कामगार आघाडी, चेअरमन विकास सोसायटी नागेश गव्हाणे, उपाध्यक्ष भाजपा शिरूर तालुका संपत गव्हाणे, दत्ता जोरे, उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा शिरूर तालुका अमोल गव्हाणे, सतीश गव्हाणे, ओंकार गुंडाळ, तालुका उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील सवाशे, दत्ता गव्हाणे, आयुष मिश्रा, ऋषिकेश गव्हाणे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी भाजपा बाबासाहेब दरेकर, अशोक हरगुडे, श्रीकांत नरके आदी यावेळी उपस्थित होते.
आंदोलनाचे निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी स्वीकारले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार यांच्यासह आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page