गजानन गव्हाणे पाटील
रक्तदान सारखा कार्यक्रम नाही. भविष्यात असेच कार्यक्रम घ्या, इतर महामानव, संत यांच्यासाठी देखील कार्यक्रम आयोजित करा, समाजाला याचा नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व इतर महा मानवांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष दीक्षांत भालेराव, बाळासाहेब भालेराव, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, पोलीस पाटील मालन गव्हाणे पाटील, बाळासाहेब भालेराव, विकास गायकवाड, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा अध्यक्ष निलेश गायकवाड, अजय काशीद, अफजल तांबोळी, पोलीस हवालदार सचिन मोरे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, आत्माराम तलोळे आदी मान्यवर व समितीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात ओम ब्लड सेंटर डॉ. रोझी, हनुमान शेळके, हर्षिता सोनवणे, वैष्णवी , मुस्कान, अस्मिता शिंदे, सलीम, विशाल यांनी सहकार्य केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दीक्षान्त भालेराव यांनी केले.





