- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसोमनाथ भंडारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सोमनाथ भंडारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -spot_img

पुणे : प्रतिनीधी
यशवंतराव चव्हाण ज्ञान प्रबोधनी (यशदा) पुणे येथे सरपंच परिषद, मुंबई, महाराष्ट्र, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये ग्रामशि लेदारांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक, आदर्श सरपंच यांचा मोठ्या उत्साहात सन्मान सोहळा फेटे, हार, सन्मान चिन्ह देऊन संपन्न झाला.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, पद्मश्री पोपटराव पवार, भारतीय प्रशासन सेवा सुनील चव्हाण, डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे साहेब, मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कृष्णा गजबे तसेच महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष विकास जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थितीत होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये एकूण २५ पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये ३ शिक्षकांचाही समावेश करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील सोमनाथ बबन भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सरांच्या २८ वर्षाच्या कालावधीत विद्यार्थी हित म्हणून विद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधा, विविध सामाजिक उपक्रम, शाळालाबाह्य मुलांना प्रवाहात आणणे, शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी सोडवणे, या अशा अनेक कार्यामुळे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने सरांच्या कार्याची दखल घेतली.
सोमनाथ भंडारे सरांना आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आज महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा पुरस्कार मिळाल्याने सर्व ग्रामस्थ, संस्थेचे पदाधिकारी व पुणे जिल्ह्यातील शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी सरांचे कौतुक केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page