- Advertisement -spot_img
Homeसांस्कृतिकराज्यभीमआर्मी आयोजित संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात स्वागत

भीमआर्मी आयोजित संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात स्वागत

- Advertisement -spot_img

बुलढाणा : प्रतिनीधी
भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद, भाई विनयरतन सिंग यांच्या आदेशाने महाराष्ट्र मध्ये संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे आयोजन महाराष्ट्र प्रमुख सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ६ वर्षांपासून सुरू आहे. पुणे ते नागपूर या प्रवासात प्रत्येक जिल्ह्यात व गावात संविधान यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.
नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या शहरात संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे आगमन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात बुलढाणा जिल्हा प्रमुख सिद्धांत वानखेडे तसेच जिल्हातील भीम आर्मी च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

चिखली या शहरात चौका चौकात जाऊन भीम आर्मीच्या वतीने संविधानाचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे असे मत यावेळी महाराष्ट्र प्रमुख सिताराम गंगावणे यांनी व्यक्त केले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अजय मेंद्रीकर, लातूर तालुका अध्यक्ष मारुती घनगावकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष सिद्धांत वानखेडे तसेच मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page