- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभारतीय जनता पार्टी शिरूर तालुका चिटणीस पदी भारती गव्हाणे पाटील

भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका चिटणीस पदी भारती गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या भारती उमेश गव्हाणे पाटील यांचे उत्तम सामाजिक कार्य, पक्ष निष्ठता, भक्कम पक्ष संघटन मिळालेल्या पदांवर उत्तम कार्य शैलीने यशस्वी करण्याचे कौशल्य या सर्व उत्तम बाबींचा विचार करून त्यांची भाजपा शिरूर तालुका चिटणीस पदी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे नवनिर्वाचीत भाजपा चिटणीस भारती उमेश गव्हाणे पाटील यांनी “आपली लोकशाही न्यूज” शी बोलताना सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी सभापती रोहिदास उंद्रे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, गणेश कुटे, संदीप भोंडवे, अक्षय फडतरे, गणेश गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गव्हाणे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page