हिरडस मावळ प्रतिनिधी : दिपक पारठे
भोर तालुक्याच्या हिरडस मावळ भागातील हिर्डोशी केंद्राच्या कोंढरी, कोंढाळकरवाडी, हिर्डोशी, धामणदेव, मालुसरे वस्ती, वारवंड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दि. (३) रोजी शालोपयोगी वस्तू तसेच गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त आपला परिवार सोशल फाउंडेशन यांच्या तर्फे एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत १०८ कीट वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढरी येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमा निमित्त धामणदेव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम नृत्य करत मान्यवरांचे जंगी स्वागत केले. व कोंढरी शाळेतील विद्यार्थ्यांनी औक्षण करून स्वागत गीत सादर केले.
उपस्थित आपला परिवार च्या मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.तसेच आपला परिवार सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सुदाम शिंदे व सह सेक्रेटरी दत्तात्रय बोऱ्हाडे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले व उपस्थित मान्यवरांचा सत्कार तसेच उपस्थित ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील आणि शिक्षक वृंद यांचा देखील सन्मान करण्यात आला.

आपला परिवारच्या वतीने १०८ कीट वाटप केल्या नंतर ग्रामस्थांनी व हिर्डोशी केंद्रातील शाळेचे शिक्षक जीवन शिंदे सर यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमा साठी हिर्डोशी केंद्रातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग तसेच कोंढरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.





