गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील पेरणे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच रुपेश ठोंबरे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, माजी सरपंच मच्छिंद्र तात्या गुंडकर, माजी उपसरपंच शरद माने, माजी चेअरमन दत्ताआबा वाळके, ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळके, गौरव झुरुंगे, संतोष देशमुख, हेमंत कंद यांच्यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





